Monday 27 June 2016

नाशिककर महिलांनी केले विकिपीडियाचे समृद्धीकरण, विकी वूमन प्रकल्पातून शहराची माहिती अद्ययावत

नाशिक - जगभरातील माहिती मिळवण्याचा महत्त्वाचा स्रोत असलेल्या विकिपीडियावर माहिती अद्ययावत करण्यात पुरुषांचे प्रमाण ९० टक्क्यांवर आहे, तर महिलांचे प्रमाण केवळ ते १० टक्केच अाहे. जगभरात असे चित्र असताना नाशिक विकी वूमन प्रकल्पाद्वारे गेल्या दीड वर्षात विकिपीडियावर माहिती अद्ययावत
करण्यात नाशिकच्या महिला आघाडीवर आहेत. पुरुषांच्या तुलनेत ५० टक्के महिलांनी नाशिक अपडेटसाठी सुरू केलेला प्रकल्प पथदर्शी ठरला आहे. आतापर्यंत तब्बल दोन हजारांहून अधिक छायाचित्रांसह नाशिकची समृद्ध माहिती विकिपीडियावर अपडेट करण्यात आली आहे.नाशिक महापालिका, कुंभथॉन आणि इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स लोकल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विकीपीडिया नाशिक समीट’चे आयोजन रविवारी केले होते. महिलांकडून सध्या फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर या सोशल मीडियाचा वापर अधिक हाेताे. त्या तुलनेत महिला विकिपीडियावर माहिती अपटेड करताना दिसत नाहीत. साहजिकच विकिपीडियावर पुरुषांविषयीची माहिती उपलब्ध होते. महिलांना अद्ययावत माहिती उपलब्ध होत नाही. कंटेट न्यूट्रॅलिटीतील ही दरी कमी करण्यासाठी नाशिकमधून सुरू करण्यात आलेला विकी वूमन हा प्रकल्प यशस्वितेच्या मार्गावर असून, या प्रकल्पात महिलांचे प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक आहे. या समीटमध्ये उपमहापाैर गुरुमित बग्गा, श्रीनिवास हेमाडे, कुंभथॉन टीमचे महेश गुजराथी, डॉ. सचिन पाचोरकर, संदीप शिंदे, गिरीश पगारे, सुभाष पाटील, विकी मीडियाचे संतोषी तिवारी, आदेश चोपडे, शिवानी पाटील, नेहा शहा आदी उपस्थित होते.
विकी वूमन प्रकल्पाद्वारे नाशिक अपडेट 
{ १२ : विकीवूमन प्रकल्पात विद्यार्थिनींचा सहभाग 
{२००० : नाशिकविषयीचीछायाचित्रे माहितीचे लेख अद्ययावत 
{१५०००० : नाशिककरांकडूनविकिपीडिया माहितीचा स्रोत म्हणून वापर 
{विकी बूक्स : ऑनलाइनपुस्तके उपलब्ध 
{विक्शनरी : मराठीइंग्रजी शब्दांची डिक्शनरी 
{विकी व्हर्सिटी : शैक्षणिकसाहित्य उपलब्ध

No comments:

Post a Comment