Saturday 25 June 2016

DANGER : 'एन बॉम्ब'च्या नशेत 'उडती मुंबई'!

राकेश त्रिवेदी, मुंबई : आजवर आपण अमली पदार्थांची अनेक नांव ऐकली आहेत... एलएसडी, एक्सटीसी, मेफेड्रीन, एम डी, म्याऊ म्याऊ... या अंमली पदार्थांबरोबरच आता आणखी एक नवं नाव या यादीत आलंय... एन-बॉम्ब... आणि ते मुंबईतही पोहोचलयं... तरूणाईचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या नवीन अंमली
पदार्थांविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट...ब्राजील, ऑस्ट्रेलिया, युरोप यांसारख्या देशांमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता 'एन बॉम्ब' हे ड्रग्सच्या नशेल्या दुनियेतल नवीन आणि सर्वाधिक खतरनाक नाव भारताच्या सीमेत दाखल झालंय. नारकोटिक्स ब्युरोनं नुकतीच गोवा आणि बंगळूरूमध्ये धडक कारवाई करत काही ड्रग्स माफियांना अटक केली. त्यांच्याकडून एन-बॉम्ब हे खतरनाक ड्रग्स जप्त करण्यात आलंय, अशी माहिती नारकोटिक्स ब्युरोचे विभागीय संचालक कुमार संजय झा यांनी दिलीय. धक्कादायक उदाहरणं... या ड्रग्समुळे आपण सुपर हिरो असल्याचा भास त्या व्यक्तीला होऊ लागतो... आपण आकाशात उंच भरारी घेऊ शकतो किंवा समुद्रात कितीही किलोमीटर अंतर पोहून पार करू शकतो, असं या नशेत व्यक्तिला वाटू लागतं.
ब्राजीलच्या कॉटनडूब आयलंडवर एक मृतदेह आढळून आला, तपास यंत्रणांनी केलेल्या तपासात त्या व्यक्तीनं एन-बॉम्बचं सेवन केल्याचं निष्पन्न झालं... त्या नशेत ती व्यक्ती सुमारे दीड किलोमीटर अंतर पोहून समुद्रात गेली, मात्र नशा उतरल्यानंतर परत येऊ शकली नाही.ऑस्ट्रेलियात एका २२ वर्षीय युवकानेही नशेच्या भरात एका उंच इमारतीवरून उडी मारण्याचा प्रयत्न केला त्यात त्याचा मृत्यू झाला. सुपरहिरोचा आभास निर्माण करणाऱ्या या ड्रग्सला पिंक सुपर मॅन, ब्ल्यू - बॅटमॅन, ब्लॅक-स्पाईडरमॅन, आय़-25 (I-25) अशा अनेक नावानं ओळखलं जातं... भारतात हे ड्रग्स २५० ते ३०० रूपयांत उपलब्ध होतं. ही किमंत इतर ड्रग्सच्या तुलनेत तशी कमी आहे.


No comments:

Post a Comment