Thursday, 7 July 2016

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला

दीपक भातुसे, मुंबई : राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा अखेर मुहूर्त ठरलाय. शुक्रवारी सकाळी नऊ वाजता शपथविधीची सोहळा होणार आहे. या विस्तारात ९ मंत्र्यांचा समावेश केला जाणार आहे. यापैकी ४ भाजपचे, ३ मित्रपक्ष आणि २ शिवसेनेचे मंत्री असतील. नेहमी राजभवनात होणारा
शपथविधीचा कार्यक्रम यंदा मंत्रालयाच्या आवारात होणार आहे. त्यासाठी तयारी सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतर मंत्रिमंडळातल्या 11 खात्यांना वाली नाहीये. त्यामुळे या विस्ताराला आणखी महत्व प्राप्त झालंय. फडणवीसांच्या मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यापासूनच मित्रपक्षांना स्थानच मिळालेलं नाही. त्यामुळे याविस्तारात विनायक मेटे, महादेव जानकर आणि सदाभाऊ खोत यांची मंत्रिपदं निश्चित करण्यात आली आहे. संभाजी निलंगेकर, मदन येरावर आणि सुभाष देशमुख यांचीही नावं निश्चित असल्याचं सूत्रांनी म्हटंलय. तर शिवसेनेला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद हवं आहे. त्याविषयीची अंतिम चर्चा आज होईल अशी माहिती मिळालीय. 

No comments:

Post a Comment