Saturday, 25 June 2016

पुण्यातील इंजिनीअरींगच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या उपग्रहाचं प्रक्षेपण

पुणे : पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनीअरींगच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या उपग्रहाचंही आज प्रक्षेपण झालं. स्वयम असं या उपग्रहाचं नाव आहे. स्वयम अवकाशात झेपावताच पुण्यातल्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बनवलेला अशाप्रकारचा पहिलाच उपग्रह आहे.
एका विशेष प्रकल्पा अंतर्गत स्वयमची निर्मिती करण्यात आली आहे. गेले वर्षभर COEP चे विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणा-या प्राध्यापकांच्या मेहनतीला यश आलंय. या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण झाल्यास त्याचा संदेशवहनासाठी उपयोग होणार आहे. स्वयमच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या शिक्षक आणि विद्यार्थ्याँनी एकच जल्लोष केला.

No comments:

Post a Comment