Saturday, 25 June 2016

माथेरानच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या वंदना शिंदे

माथेरान गिरीस्थान नगरपालिकेच्या रिक्त असलेल्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना शैलेश शिंदे यांची तर उपाध्यक्ष म्हणून विनीता दिलीप गुप्ता यांची आज बिनविरोध निवड झाली. गौतम गायकवाड यांनी नगराध्यक्ष पदाचा तसेच सुनीता पेमारे यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने त्या दोन्ही रिक्त
पदासाठी निवडणूक घेण्यात आली. माथेरानचे महसूल अधीक्षक संतोष शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली माथेरान गिरीस्थान नगरपालिकेच्या अनुसूचित जाती राखीव असलेल्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यात आली. निर्धारित वेळेत नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना शैलेश शिंदे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. अध्यक्षपदाची निवडणूक पीठासीन अधिकारी संतोष शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी पालिका सभागृहात झाली. त्या वेळी एकमेव अर्ज दाखल झाल्याने वंदना शिंदे यांची अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर रिक्त असलेल्या उपनगराध्यक्ष पदासाठी नवनिर्वाचित नगराध्यक्ष वंदना शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. त्या वेळी उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात आली. उपाध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विनीता गुप्ता यांचा अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे पीठासीन अधिकारी नगराध्यक्ष वंदना शिंदे यांनी माथेरान गिरीस्थान नगरपालिकेच्या उपाध्यक्ष म्हणून विनीता गुप्ता यांची निवड झाल्याचे जाहीर केले. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी आयोजित विशेष बठकीला १७ पकी ४ लोकप्रतिनिधी अनुपस्थित होते. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक आणि शिवसेनेच्या तीन सदस्यांचा समावेश होता. विशेष सभेला मावळते नगराध्यक्ष गौतम गायकवाड, तसेच अजय सावंत, मनोज खेडकर, दिलीप गुप्ता, राजेश दळवी, दिनेश सुतार, शिवाजी शिंदे, सुनीता आखाडे, उषा पांगसे, हिरावती सकपाळ, सुनीता पेमारे, विनीता गुप्ता, वंदना शिंदे, तसेच स्वीकृत सदस्य संतोष पवार, दीपक जाधव आदी सदस्य उपस्थित होते. निवडणूक अधिकाऱ्यांना मुख्याधिकारी सागर घोलप यांनी सहकार्य केले. -

No comments:

Post a Comment