नवी दिल्ली, दि. २७ - भारत सोमवारी क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण आणि हस्तांतरण (एमटीसीआर) देशांच्या गटाचा अधिकृत सदस्य झाला. परराष्ट्र सचिव एस.जयशंकर यांनी कागदपत्रांवर स्वाक्षरी केल्यानंतर भारताला अधिकृतपणे या गटाचे सदस्यत्व मिळाले. फ्रान्स आणि हॉलंडचे राजदूत यावेळी उपस्थित होते. भारताच्या या
प्रवेशाचा जगाला निश्चित फायदा होईल असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. भारत एमटीसीआर गटात प्रवेश करणारा ३५ वा देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौ-यावर असताना भारताचा या गटात समावेशाचा मार्ग मोकळा झाला होता. भारताच्या प्रवेशावर अन्य ३४ देशांनी कुठलीही हरकत घेतली नाही. एमटीसीआर समावेशासाठी भारत मागच्या दशकभरापासून प्रयत्न करत होता. एमटीसीआरमुळे क्षेपणास्त्र तंत्रज्ञान मिळवणे होणार सोपे एमटीसीआरमध्ये समावेशाचे काही फायदेही आहेत आणि बंधने आहेत.एमटीसीआरमध्ये प्रवेश केल्यानंतर भारताला आपल्या क्षेपणास्त्र तंत्रज्ञान आणि प्रक्षेपणाची माहिती सदस्य देशांना द्यावी लागेल. देशाच्या पुढच्या टप्याच्या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमावर याचा काहीही परिणाम होणार नाही. कारण यामध्ये क्षेपणास्त्र विकासावर कुठलेही कायदेशीर बंधन नाही. या गटात समावेश केल्यामुळे दुस-या देशांकडून क्षेपणास्त्र तंत्रज्ञान मिळवणे भारतासाठी अधिक सोपे होणार आहे. पण भारताने तंत्रज्ञान दुस-या देशाला दिले किंवा व्यवहार केला तर त्याची माहिती सदस्य देशांना द्यावी लागेल.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment