Monday, 27 June 2016

ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांचा राजीनामा

लंडन, दि. 24 - ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी राजीनामा देणार असल्याचे शुक्रवारी सकाळी जाहीर केले. सार्वमतामध्ये ब्रिटिश जनतेने युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर देशाला उद्देशून कॅमेरून यांनी भाषण केले. ब्रिटनने युरोपीय महासंघात रहावे या मताचे असलेल्या कॅमेरून यांनी
नैतिक पराजय मान्य करत राजीनामा देण्याची घोषणा केली तसेच जनमताचा आदर करत युरोपीय महासंघातून वेगळे होण्याच्या दृष्टीने वाटचाल केली जाईल याची हमी दिली.कॅमेरून हे तीन महिने पंतप्रधानपदी राहतिल आणि त्यानंतर पायउतार होतील. या काळात ब्रिटनच्या भावी पंतप्रधानाचा निर्णय केला जाईल.

No comments:

Post a Comment