लंडन : भारतीय हॉकी संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात पहिल्यांदाच अंतिम फेरीत प्रवेश केलाय. अंतिम फेरीत भारतीय संघ जगज्जेत्या ऑस्ट्रेलिया संघाशी दोन हात करणार आहे. याआधी १९८२मध्ये भारतीय संघाने नेदरलँडला हरवत कांस्यपदक मिळवले होते. संघाच्या या परफॉर्मन्समुळे ऑलिंपिकमध्ये पदक
मिळवण्याच्या भारतीय संघाच्या आशा वाढल्या आहेत. गेल्या ३६ वर्षात ऑलिंपिंमध्ये हॉकीत भारताला पदक मिळालेले नाही.चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात भारत-ऑस्ट्रेलिया १४ वेळा आमने सामने आलेत. यापैकी १० वेळा ऑस्ट्रेलियाला विजय मिळवता आला तर दोनवेळा भारतीय संघाने विजय मिळवला. २००२मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा विजय मिळवला होता.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment