मुंबई : पवित्र रमझान महिना ईदच्या दिवशी म्हणजेच बुधवारी संपत आला आहे. उद्या ईद आहे पण चंद्राचं दर्शन न झाल्यानं आता ईद बुधवारऐवजी गुरूवारी साजरी केली जाणार आहे. चंद्र न दिसल्याने दिल्लीच्या जामा मशीदीचे शाही इमाम सैयद अहमद बुखारी यांनी ईद गुरूवारी साजरी होणार अशी घोषणा केली आहे. तर
लखनऊ चांद कमिटीनेही ईद बुधवार ऐवजी गुरुवारी साजरी केली जाईल अशी घोषणा केली आहे. केंद्र सरकारने देखील शासकीय कार्यालयांना बुधवारऐवजी गुरूवारी सुटी देण्याची घोषणा केली आहे. मंगळवारी चंद्र दिसेल असा अंदाज व्यक्त होत होता पण चंद्र न दिसल्यामुळे ईद गुरूवारी साजरी होणार आहे. सौदी अरब आणि मध्य पूर्व देशांमध्ये बुधवारी ईद साजरी केली जाणार आहे. या देशांमध्ये हा सण ३ दिवस साजरा केला जातो.Wednesday, 6 July 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment