डहाणू : डहाणू रोड आणि वाणगाव दरम्यान मालगाडीचे 11 डबे घसरून आता 24 तासांहून अधिक उलटलेत. पण पश्चिम रेल्वेची लांबपल्ल्याची वाहतूक अजूनही सुरळीत झालेली नाही. मुंबईकडे येणाऱ्या गाड्यांची वाहतूक सुरू झालेली असली तरी गुजरातमार्गे उत्तरेत जाणाऱ्या गाड्यांचा अजूनही खोळंबा सुरूच आहे. आज
गुजरातकडे जाणाऱ्या सात गाड्यांच्या वेळापत्रकात मोठे बदल करण्यात आले आहेत. तर 12 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पश्चिम रेल्वेच्या वाहतूकीला गुजरातमध्ये झालेल्या मुसळधार पावसाचाही फटका बसलाय.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment