कॅनडा ओपन ग्राँप्रि बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या बॅडमिंटनपटूंनी दुहेरी यश मिळवले. पुरुष एकेरीत चौथा सीडेड बी. साई प्रणीथ अजिंक्य ठरला.कॅलगेरी- कॅनडा ओपन ग्राँप्रि बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या बॅडमिंटनपटूंनी दुहेरी यश मिळवले. पुरुष एकेरीत चौथा सीडेड बी. साई प्रणीथ अजिंक्य ठरला. त्याचे हे पहिलेच आंतरराष्ट्रीय जेतेपद
आहे. पुरुष दुहेरीत मनु अत्री आणि बी. सुमीथ रेड्डीने बाजी मारली.२३ वर्षीय प्रणीथने अंतिम फेरीत तिस-या सीडेड दक्षिण कोरियाच्या ली युन द्वितीयला २१-१२, २१-१० असे सरळ गेममध्ये हरवले. तासाभरात चाललेल्या लढतीत प्रणीथने वर्चस्व राखले. अव्वल सीडेड मनु-सुमीथ जोडीने कॅनडाच्या अड्रियन लीउ आणि टॉबी एनजीवर २१-८, २१-१४ असा सहज विजय मिळवला. ही जोडी रिओ ऑलिंपिकसाठी पात्र ठरली आहे. कॅनडा ओपन जिंकल्याने मनु-सुमीथचा आत्मविश्वास अधिकच उंचावला आहे.वारंवार दुखापतींनी ग्रासल्याने प्रणीथला आंतरराष्ट्रीय स्पर्धात मोठी मजल मारता आली नव्हती. मात्र २०१३मध्ये थायलंड ओपनमध्ये ऑल इंग्लंड विजेता मलेशियाचा मोहम्मद हफिझ हाशिम तसेच त्याच वर्षी इंडोनेशिया ओपनमध्ये माजी जागतिक आणि ऑलिंपिक पदकविजेता इंडोनेशियाच्या तौफिक हिदायतला हरवून त्याने खळबळ माजवली. यंदा ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत दोन वेळचा ऑलिंपिक रौप्यपदक विजेता मलेशियाचा ली चोंग वीला सलामीला हरवले. मात्र आंध्र प्रदेशच्या प्रतिभावंत बॅडमिंटनपटूंने कॅनडा ओपनमध्ये अप्रतिम खेळ करत कारकिर्दीतील पहिलेवहिले आंतरराष्ट्रीय जेतेपद पटकावले. अंतिम फेरीत ली युन द्वितीयविरुद्ध प्रणीथने पहिल्या गेममध्ये १०-२ तसेच दुस-या गेममध्ये ८-० अशी आघाडी घेत आपले वर्चस्व सिद्ध केले. जागतिक क्रमवारीत २३व्या स्थानी असलेल्या मनु आणि सुमीथला प्रतिस्पर्धी अड्रियन लीउ आणि टॉबी एनजीकडून फारसा प्रतिकार झाला नाही. पहिल्या गेममध्ये सुरुवातीला चांगली चुरस पाहायला मिळाली. त्यामुळे ३-३ अशी बरोबरी होती. मात्र त्यानंतर आघाडी घेत मोठया फरकाने गेम जिंकला. दुस-या गेममध्ये मनु-सुमीथ जोडीने सातत्य राखले. ऑलिंपिक पूर्वीच्या जेतेपदाने या जोडगोळीचा आत्मविश्वास उंचावला आहे.Wednesday, 6 July 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment