बार्सिलोना, दि. ६ - कर चुकवेगिरीच्या तीन गुन्ह्यांमध्ये स्पॅनिश न्यायालयाने प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला २१ महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. मागच्याच आठवडयात कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिमफेरीत चिलीकडून पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव झाल्यानंतर मेस्सीने तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
केली होती. मेस्सी आणि त्याच्या वडिलांना २१ महिले कारावासाची शिक्षा सुनावली आहे. मेस्सीला एकूण २० लाख युरोचा दंड ठोठावण्यात आला आहे. मेसीने चाळीस लाख युरोचा कर भरण्याचे टाळून स्पेनची फसवणूक केल्याचा त्याच्यावर आरोप होता. जगातील सर्वात महागडा फुटबॉल खेळाडू असणा-या मेसीवर कर घोटाळयाचा आरोप होता. Wednesday, 6 July 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment