मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार हा एनडीएचा विस्तार नसून फक्त भाजपचा विस्तार असल्याची तिखट प्रतिक्रिया आज शिवसेनेने दिली आहे. दरम्यान, आम्ही लाचार नाही, कुणाकडेही मंत्रिपद मागणार नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी आधीच स्पष्ट केले होते. भाजपने विस्तार करताना सर्व
भाजपच्या खासदारांना स्थान दिले आहे.अकाली दल, शिवसेना, तेलगू देसम कुणालाही विस्ताराला स्थान देण्यात आलेले नसल्याने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. मोदी यांच्या मंत्रिमंडळात १९ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. मात्र, हे सर्व चेहरे भाजपमधील आहेत. आठवले हे भाजपच्या कोट्यातून राज्यसभेत आहेत. तर अनुप्रिया पटेल यांचा पक्ष भाजपसोबत आहे. त्यांनी अकाली दलाला किंवा तेलुगु देशमला निमंत्रित केले नाही. हा पंतप्रधानांचा निर्णय होता. त्यामुळे या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेचा सहभाग नसल्याची आम्हाला काहीही चिंता नसल्याचे राऊत यांनी सांगितले.Wednesday, 6 July 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment