Wednesday, 6 July 2016

ई-रिटर्न धारकांची संख्या एक कोटींवर

मुंबई : आयकर विवरण पत्र ऑनलाईन भरण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेला चांगला प्रतिसाद मिळतोय. ई-रिटर्न धारकांची संख्या एक कोटींवर पोहचलीय. आयकर विभागाच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत 1 कोटी 2 लाख 8 हजार 715 करदात्यांनी इंटरनेटवर आधारित प्रणालीच्या माध्यमातून विवरण पत्र भरलंय. सीबीडीटी
म्हणजेच केंद्रीय प्रत्यक्ष करनिर्धारण मंडळ आणि आयकर विभागाकडून पहिल्यांदाच आधार नंबर, इंटरनेट बँकिंग आणि बँक खात्यासह ईमेल, मोबाईल नंबर यांचा वापर शक्य असलेली प्रणाली विकसित केली. त्यामुळं ही प्रक्रिया अधिक सुलभ झालीय. ऑनलाईन रिटर्न भरण्याची शेवटची मुदत 31 जुलैपर्यंत आहे. 

No comments:

Post a Comment