पं. जी. एल. सामंत तबला विद्यालयाच्या रोहन प्रसाद भडसावळे याला राष्ट्रीय स्तरावरील तबलावादन स्पर्धेत ‘तबला नवाज ऑफ पुणे’ म्हणून गौरविले. लखनौ येथील संगीत मिलन संस्थेतर्फे आयोजित या तबलावादन स्पर्धेत चाळीसहून अधिक तबलावादक सहभागी झाले होते. लहान, मध्यम, मोठा आणि युवा अशा चारही
विभागात सवरेत्कृष्ट वादन करणाऱ्यास तबला नवाज म्हणून गौरविण्यात येते. रोहन भडसावळे हा या पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. एस. पी. एम. प्रशालेमध्ये दहावीत शिक्षण घेत असलेला रोहन हा सागर सामंत आणि पं. सुरेश सामंत यांचा शिष्य आहे. पुण्यातील ज्येष्ठ तबलावादक आनंद सिधये आणि दिल्ली येथील ज्येष्ठ तबलावादक उस्ताद हशमत अली खाँ यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले. Thursday, 7 July 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment