अमेरिकेच्या विलयम्स बहिणी सेरेना आणि व्हिनस यांनी विम्बल्डन टेनिस स्पर्धेत शुक्रवारी महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली. आमानांकित विल्यम्स बहिणींनी जर्मनीच्या ज्युलिया जॉर्जेस आणि झेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिसकावा या आठव्या मानांकित जोडीचा १ तास ३७ मिनिटांत ७-६, ६-४ असा
सलग सेट्समध्ये पराभव केला. सेरेना विल्यम्सने याआधीच या स्पर्धेच्या महिला एकेरीत अंतिम फेरी गाठली आहे तर व्हीनसला काल उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता. विल्यम्स बहिणींनी १३ ग्रँडस्लॅम स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले आहे. तसेच त्या विम्बल्डनमध्ये पाच वेळेस चॅम्पियनही ठरल्या आहेत. या दोघींनी याआधी २0१२ मध्ये विम्बल्डनमध्ये महिला दुहेरीचे अजिंक्यपद पटकावले होते. Saturday, 9 July 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
This comment has been removed by the author.
ReplyDeleteYour blog is very good and helpful.
ReplyDeleteSarkariNaukriFinder.com is India’s leading government job portal. Use our advanced job search engine to find all the latest sarkari naukri in India, sarkari naukri, sarkari results, sarkari naukri results, sarkari job railway, sarkari job notification, sarkari naukri ssc, download admit card, etc.