वॉशिंग्टन : नासाचं जुनो नावाचं यान आजपासून गुरू ग्रहाभोवती घिरट्या घालायला सुरुवात करणार आहे. सुमारे 3.6 टन वजनाचं हे यान 5 ऑगस्ट 2011 ला प्रक्षेपित करण्यात आलंय. 2.8 अब्ज किलोमीटर प्रवास करत ते गुरू ग्रहाजवळ पोचणार आहे. साधारण एका महिन्यापूर्वी ते गुरू ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली आलं होतं. गुरु
ग्रहाचं गुरुत्वाकर्षण, चुंबकीय शक्ती, ग्रह कशापासून बनलाय, ग्रहावरची वादळं आणि पाण्याची उपलब्धता या सर्वाचा अभ्यास हे यान करणार आहे. Wednesday, 6 July 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment