‘भारतीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थे’त (एफटीआयआय) चित्रपट, दूरचित्रवाणी व ‘डिजिटल’ माध्यमांविषयीचे विविध नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याच्या प्रस्तावास मंगळवारी संस्थेच्या नियामक मंडळाची मान्यता मिळाली आहे. यात कमी कालावधीच्या अभ्यासक्रमांचाही समावेश आहे. संस्थेत श्रेयांक
मूल्यमापन पद्धती सुरू करण्यासही मान्यता मिळाली आहे. ‘एफटीआयआय’च्या नियामक मंडळाची मंगळवारी मुंबईत बैठक झाली. या बैठकीत नवीन अभ्यासक्रमाला मान्यता देण्यात आली, तसेच संस्थेच्या प्रस्तावित विकास आराखडय़ालाही मान्यता देण्यात आली. संस्थेच्या विद्या परिषदेचे अध्यक्ष दिग्दर्शक बी. पी. सिंग यांनी नवीन अभ्यासक्रमांविषयीचा प्रस्ताव मांडला होता. ‘एफटीआयआय’च्या छत्राखाली नऊ विविध विभाग स्थापन करून त्याद्वारे बावीस अभ्यासक्रम सुरू करण्याचा हा प्रस्ताव होता. यात संगीत दिग्दर्शन, अॅनिमेशन आणि गेमिंग, रंगभूषा, कपडेपट अशा छोटय़ा अभ्यासक्रमांचाही समावेश आहे. नवीन अभ्यासक्रमांबरोबर आता सुरू असलेले अभ्यासक्रम सुरूच राहतील. Thursday, 7 July 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment