Showing posts with label Political News. Show all posts
Showing posts with label Political News. Show all posts

Saturday, 9 July 2016

जोहान्सबर्गमध्ये नमो नमो !

 अफ्रिकन देशांच्या दौ-यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जोहान्सबर्ग येथील भारतीय नागरिकांना संबोधित केले. यावेळी त्यांनी सर्वांचे आभार मानत त्यांनी मी सर्व भारतीयांच्या स्वप्नांना सोबत घेऊन आल्याचे सांगितले. तसेच, दक्षिण अफ्रिकामध्ये आल्यावर मला खूप आनंद झाल्याचे स्पष्ट केले.

Thursday, 7 July 2016

रामराजेंची सभापतिपदी निवड निश्‍चित

मुंबई - विधान परिषदेच्या सभापतिपदी रामराजे नाईक निंबाळकर यांची फेरनिवड निश्‍चित आहे. विशेष अधिवेशनात रामराजेंची बिनविरोध होणार हे जवळपास ठरले आहे. परिषदेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बळ लक्षात घेता भाजप शिवसेना एकत्र आले, तरी सभापती म्हणून निवड होण्याची शक्‍यता दुरापास्त असल्याने सत्तारूढ

गुलाबराव पाटील यांना शिवसेनेने का दिले मंत्रीपद?

मुंबई : जळगाव ग्रामीणचे आमदार गुलाबराव पाटील यांना राज्यमंत्री पदाची लॉटरी लागली आहे. उत्तर महाराष्ट्रातील शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून गुलाबराव पाटील यांची ओळख आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना गुलाबराव पाटील यांनी अंगावर घेतले होते. त्यांना थेट आव्हान दिले. उत्तर

या दोन मंत्रालयाच्या कामावर मोदी होते नाराज, बदलली पूर्ण टीम

नवी दिल्ली :  मोदींच्या मंत्रिमंडळात मोठ्या प्रमाणात फेरबदल झाल्याने नव्याने १९ मंत्री दाखल झाले ही बातमी दाबली गेली. 
कोणते दोन मंत्रालय:- यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या मंत्रालयावर नाराज होते

दिग्विजय सिंग झाकीर नाईकला म्हणाले होते शांतीदूत

मुंबई : काँग्रेस नेते दिग्विजय यांनी झाकीर नाईकचं केलेलं कौतूक काँग्रेसला चांगलच भोवण्याची शक्यता आहे. 2012 सालच्या झाकीर नाईकच्या कार्यक्रमामध्ये दिग्विजय सिंग सहभागी झाले होते. झाकीर नाईक शांतीदूत असल्याचं दिग्विजय सिंग या कार्यक्रमात म्हणाले होते. या कार्यक्रमाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. 

'राक्षस' शिवसैनिकांनी जाळला शेलारांचा पुतळा

मुंबई : एकीकडे राज्यमंत्रिमंडळाच्या विस्ताराची तारीख निश्चित होत असताना शिवसेना आणि भाजपमधली दुही दिवसेंदिवस वाढतेय.बुधवारी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेला राक्षस म्हणून हिणवल्यावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळीय. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आशिष

राज्य मंत्रिमंडळ विस्तार, भाजपची नावे निश्चित

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई :  राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर भाजपमधल्या मंत्रिपदाच्या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय.  पांडुरंग फुंडकर, सुभाष देशमुख, जयकुमार रावल, संभाजी पाटील निलंगेकर, मदन येरावार आणि शिवाजीराव नाईक यांची मंत्रिपदी वर्णी लागणार आहे.  तर मित्रपक्षा कडून

मंत्रिमंडळ विस्तार : शिवसेनेकडून अधिकृत दोन नावांची घोषणा

मुंबई :  गेल्या दोन दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना सामील होणार की नाही या प्रश्नाला पूर्णविराम मिळाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन राज्यमंत्री पदाच्या उमेदवारांची घोषणा केली आहे. शिवसेनेने दोन राज्यमंत्रीपदावर समाधान मानले असून अर्जुन खोतकर आणि गुलाबराव पाटील यांचे नाव

मंत्रिमंडळ विस्तार : भाजपच्या ६, शिवसेनेच्या २ तर मित्रपक्षाच्या २ मंत्र्यांनी घेतली शपथ

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालाय. नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा नुकताच पार पडलाय. सहा कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतलीय. तर पाच राज्यमंत्र्यांनी शपथ घेतलीय.
उद्धव ठाकरे गैरहजर: यामध्ये भाजपच्या सहा, शिवसेनेचे दोन तर मित्रपक्षाच्या दोन मंत्र्यांनी मंत्र्यांचा सहभाग आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मात्र गैरहजर राहिले. विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला. 
राम शिंदेंना बढती : राज्य मंत्रिमंडळ विस्तारात राम शिंदे यांना कॅबिनेटपदी बढती मिळालीय. पांडुरंग फुंडकर, राम शिंदे, जयकुमार रावल, सुभाष देशमुख, संभाजी निलंगेकर, महादेव जानकरांसह सहा कॅबिनेट मंत्र्यांना शपथ देण्यात आली. तर रवींद्र चव्हाण, मदन येरावार, अर्जून खोतकर, गुलाबराव पाटील आणि सदाभाऊ खोत यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतलीय.
- पांडुरंग फुंडकर यांनी मंत्रिपदाची घेतली शपथ
- प्रा. राम शंकर शिंदे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ...  
- जयकुमार जितेंद्रसिंह रावल यांनी घेतली शपथ... रावल उद्योग समुहाचे सर्वेसर्वा... रावल सिंदखेडा मतदारसंघाचे आमदार... भाजपच्या तिकिटावर तिसऱ्यांचा आमदार 
- संभाजी दिलीपराव पाटील निलंगेकर यांनी घेतली शपथ ... निलंग्याचे भाजप आमदार... माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे नातू   
- सुभाष सुरेशचंद्र देशमुख यांनी घेतली शपथ... भाजपचे सोलापूरचे आमदार... देशमुख लोकमंगल उद्योग समुहाचे अध्यक्ष... २००९ मध्ये माढामधून शरद पवारांविरोधात पराभूत
- महादेव जानकर यांनी घेतली शपथ... विधान परिषदेचे आमदार... धनगर आरक्षणासाठी लढा... २००३ साली राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना... २०१४ साली भाजपबरोबर युती
- शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांनी घेतली शपथ... जालना मतदारसंघाचे आमदार... शिवसेनेच्या शिवजलक्रांती योजनेचे मराठवाडा प्रमुख... विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुखपद भूषवलं
- रविंद्र दत्तात्रय चव्हाण यांनी घेतली शपथ... २००९, २०१४ मध्ये डोंबिवलीतून विधानसभेवर... २००७ - २००८ मध्ये स्थायी समिती सभापती
- मदन मधुकरराव येडावार यांनी घेतली शपथ... यवतमाळचे भाजप आमदार... यवतमाळमध्ये भाजपची ताकद वाढवण्यात योगदान... २७ वर्षांपासून भाजपचे सदस्य... १९९६, २००४, २०१४ साली आमदार म्हणून विजयी 
- गुलाबराव रघुनाथराव पाटील यांनी घेतली शपथ... १९९५ शिवसेना जिल्हा प्रमुख... २००४ साली येरंडोलमधून विधानसभेवर निवड... २०१४ मध्ये जळगाव ग्रामीणमधून पुन्हा विधानसभेवर
- सदाभाऊ खोत यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ... सदाभाऊ स्वाभिमानी पक्षाचे नेते आहेत... शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढणारे नेते अशी त्यांची ओळख आहे.

'जावडेकरांना मनुष्यबळ विकास मंत्री बनवणं हे भयंकर आहे'

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारनं मंत्रिमंडळ विस्तारानंतर काँग्रेसनं तिखट प्रतिक्रिया दिलीय. यावेळी, त्यांनी प्रकाश जावडेकरांच्या निवडीवरही अनेक प्रश्नचिन्ह उभे केलेत. प्रकाश जावडेकरांना मनुष्यबळ विकास मंत्री बनवणं हा सार्वजनिक शिक्षण प्रणाली खाजगी क्षेत्रात वळवण्याचा 'व्यवस्थित प्रयत्न' असल्याचं काँग्रेसचे

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला

दीपक भातुसे, मुंबई : राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा अखेर मुहूर्त ठरलाय. शुक्रवारी सकाळी नऊ वाजता शपथविधीची सोहळा होणार आहे. या विस्तारात ९ मंत्र्यांचा समावेश केला जाणार आहे. यापैकी ४ भाजपचे, ३ मित्रपक्ष आणि २ शिवसेनेचे मंत्री असतील. नेहमी राजभवनात होणारा

Wednesday, 6 July 2016

कुछ तो लोग कहेंगे लोगो का काम हैं कहना - स्मृती इराणी

नवी दिल्ली, दि. ६ - मंत्रिमंडळ विस्तारामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्मृती इराणींना झटका दिला. त्यांच्याकडून मनुष्यबळ विकास मंत्रालय काढून घेत कमी महत्वाचे वस्त्रोद्योग मंत्रालय दिले. या खातेबदलचीच सर्वत्र सर्वाधिक चर्चा होत असताना स्मृती इराणी यांनी बुधवारी दुपारी वस्त्रोद्योग मंत्री म्हणून

महाराष्ट्राच्या वाट्याला ३ मंत्रीपदं

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी कॅबिनेट मंत्रीमंडळाचा विस्तार केला. यामध्ये अनेक मंत्र्याचं खाते देखील बदलण्यात आलं आहे. स्मृति इराणी यांचे मनुष्यबळ विकास मंत्रालय काढून ते प्रकाश जावडेकरांना देण्यात आलं आहे तर इराणी यांना वस्त्रोद्योग मंत्रालय देण्यात आले आहे. 
महाराष्ट्राच्या वाट्याला कोणती खाती:-
१) डॉ. सुभाष भामरे - संरक्षण राज्यमंत्री 
२) रामदास आठवले - सामाजिक न्याय राज्यमंत्री 
३) हंसराज आहीर - गृह राज्यमंत्री 

नव्या मंत्र्यांना पहिल्याच दिवशी मोदींच्या ५ सूचना

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी कॅबिनेट मंत्रीमंडळाचा विस्तार केला. यामध्ये अनेक मंत्र्याचं खाते देखील बदलण्यात आलं आहे. स्मृति इराणी यांचे मनुष्यबळ विकास मंत्रालय काढून ते प्रकाश जावडेकरांना देण्यात आलं आहे तर इराणी यांना वस्त्रोद्योग मंत्रालय देण्यात आले आहे. नव्या मंत्र्यांची पंतप्रधान मोदींनी

Monday, 27 June 2016

दाखवलेली स्वप्ने पूर्ण करण्यात सत्ताधारी अपयशी – शरद पवार

सत्ताधारी दाखवलेली स्वप्ने पूर्ण करण्यात अपयशी ठरली आहेत. कामगार, महिला, दलित, सामान्य जनता यांच्या विरोधात असलेली शक्ती पुन्हा उभी राहू द्यायची नाही. त्यासाठी आगामी पालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी छातीचा कोट करून लढावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे