Thursday, 7 July 2016

टॉम अल्टर यांच्याकडून अभिनय विभागाच्या प्रमुखपदाचा राजीनामा मागेटॉम अल्टर यांच्याकडून अभिनय

ज्येष्ठ अभिनेते टॉम अल्टर यांनी चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेतील (एफटीआयआय) अभिनय विभागाच्या प्रमुखपदाचा दिलेला राजीनामा मागे घेतला आहे. कार्यबाहुल्यामुळे ‘एफटीआयआय’ला वेळ देता येत नसल्याचे कारण देऊन गेल्या महिन्यात अल्टर यांनी राजीनामा दिला होता, परंतु विद्यार्थ्यांशी पटत
नसल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चाही त्या वेळी रंगली होती. ‘एफटीआयआय’चे संचालक भूपेंद्र केंथोला यांनी अल्टर हे पुन्हा संस्थेत कार्यरत होणार असल्याच्या माहितीस दुजोरा दिला. संस्थेच्या विद्या परिषदेने अल्टार यांचे मन वळवण्याची जबाबदारी केंथोला यांच्याकडे सोपवली होती. 

No comments:

Post a Comment