Thursday, 7 July 2016

दिग्विजय सिंग झाकीर नाईकला म्हणाले होते शांतीदूत

मुंबई : काँग्रेस नेते दिग्विजय यांनी झाकीर नाईकचं केलेलं कौतूक काँग्रेसला चांगलच भोवण्याची शक्यता आहे. 2012 सालच्या झाकीर नाईकच्या कार्यक्रमामध्ये दिग्विजय सिंग सहभागी झाले होते. झाकीर नाईक शांतीदूत असल्याचं दिग्विजय सिंग या कार्यक्रमात म्हणाले होते. या कार्यक्रमाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. 

ढाक्यामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ला करणारे दहशतवादी आम्ही झाकीर नाईक यांच्या भाषणांनी प्रभावित झालो आणि हल्ला केला असल्याचं समोर येत आहे. झाकीर नाईक मुंबईतल्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचा संस्थापक आहे. या संघटनेला ब्रिटन आणि कॅनडामध्ये बंदी घालण्यात आली आहे. दिग्विजय सिंग आणि झाकीर नाईक यांचा हा व्हिडिओ पीस टीव्हीवर प्रसारित करण्यात आला होता. या कार्यक्रमात घेतलेल्या सहभागावरून आणि झाकीर नाईकच्या कौतुकावरून भाजपनं काँग्रेसवर टीका केली आहे.

No comments:

Post a Comment