Wednesday, 6 July 2016

डाळ पोहचवण्यासाठी रेशनिंग दुकानदारांवर सरकारचा वचक आवश्यक

मुंबई : तुरडाळीचे दर नियंत्रणात येत नसल्यामुळं आता तूरडाळ रेशनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी अन्न आणि नागरी पुरवठा खात्यानं हे पाऊल उचललंय. या योजनेचं सर्वसामान्य जनतेकडून कौतुक होतंय. मात्र अनेक रेशन दुकानदारांविषयी मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत,
त्यांचं निरसन मंत्रायात तात्काळ होत नसल्याचा आरोप तक्रारदारांचा आहे. तक्रारदारांना मंत्रिमहोदयांसमोर प्रश्न मांडण्यासाठी मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत. तक्रारीचे निकाल लवकर येत नाहीत, तसेच अनेक दुकानदारांवरील कारवायांना कोणताही आगापिछा न पाहता स्थगितीचे आदेश देण्यात येतात.
तूरडाळ विषयी जाहीर प्रसिद्धी होईल का?
अंत्योदय योजनेतल्या २४ लाख ७२ हजार तर ४५ लाख ३४ हजार बीपीएल शिधापत्रिकाधारकांना याचा लाभ होणार आहे. डाळीच्या भावात वाढ होत असल्यानं सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी आता तुरडाळ रेशनवर मिळणार आहे. नाही तर सरकारची डाळ चढ्या भावाने दुकानांवर येईल...मात्र रेशनिंगवर तूरडाळ कोणत्या तारखेदरम्यान उपलब्ध होईल, अंत्योदय आणि बीपीएल शिधाधारकांना प्रति व्यक्ती किती तूरडाळ घेता येईल, याची जाहीर प्रसिद्धी वर्तमान पत्र आणि सोशल मीडियातून दिली तरच फायदा होईल, नाही तर मोठ्या प्रमाणात ही डाळ काळ्या बाजारात जाते, असं झालं तर या निर्णयाचा फायदा तर होणारच नाही, उलट सरकारचीच डाळ चढ्या भावाने दुकानांवर विकली जाईल. प्रायोगिक तत्वावर योजना ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तीन महिन्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर ही योजना सुरू करण्यात आली आहे. प्रतिमहिना एक किलो १२० रुपये दराने ही तूरडाळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

No comments:

Post a Comment