Wednesday, 6 July 2016

कुछ तो लोग कहेंगे लोगो का काम हैं कहना - स्मृती इराणी

नवी दिल्ली, दि. ६ - मंत्रिमंडळ विस्तारामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्मृती इराणींना झटका दिला. त्यांच्याकडून मनुष्यबळ विकास मंत्रालय काढून घेत कमी महत्वाचे वस्त्रोद्योग मंत्रालय दिले. या खातेबदलचीच सर्वत्र सर्वाधिक चर्चा होत असताना स्मृती इराणी यांनी बुधवारी दुपारी वस्त्रोद्योग मंत्री म्हणून
पदभार स्वीकारला. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी वस्त्रोद्योगाच्या माध्यमातून देशसेवेची संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. वस्त्रोद्योगाला चालना देण्याची पंतप्रधानांचे स्वप्न आहे मी त्या दिशेने काम करीन असे इराणी यांनी सांगितले. स्मृती इराणी पदावर असताना विविध वादात अडकल्यामुळे त्यांचे मनुष्यबळ विकास मंत्रालय नेहमीच चर्चेत राहिले. त्यांच्या खातेबदलाच्या चर्चेवर त्यांनी कुछ तो लोग कहेंगे, लोगो का काम हैं केहना अशी प्रतिक्रिया दिली.

No comments:

Post a Comment