Thursday, 7 July 2016

रामराजेंची सभापतिपदी निवड निश्‍चित

मुंबई - विधान परिषदेच्या सभापतिपदी रामराजे नाईक निंबाळकर यांची फेरनिवड निश्‍चित आहे. विशेष अधिवेशनात रामराजेंची बिनविरोध होणार हे जवळपास ठरले आहे. परिषदेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बळ लक्षात घेता भाजप शिवसेना एकत्र आले, तरी सभापती म्हणून निवड होण्याची शक्‍यता दुरापास्त असल्याने सत्तारूढ
आघाडी त्यांच्या अविरोध निवडीचा प्रस्ताव ठेवतील. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील ज्येष्ठ नेते हेमंत टकले यांचीही सभापतिपदाच्या नावासाठी चर्चा होती, मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज टकले यांनी ज्येष्ठतेला मान द्यावा, असे त्यांना कळवले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्या उपसभापतीची निवड होणार नाही. उपसभापतिपदाची निवडणूक घेण्याचा अधिकार सभापतीला आहे. कॉंग्रेसला राष्ट्रवादी कॉंग्रेसने उपसभापतिपद देण्याचे आश्‍वासन अगोदरच दिले आहे. अलिखित करारानुसार या शब्दाखातर कॉंग्रेसने दोन उमेदवार न टाकता केवळ एक उमेदवार परिषद निवडणुकीत रिंगणात उतरवला होता.

No comments:

Post a Comment