Thursday 7 July 2016

वंदना चव्हाण यांच्या कार्यावरील पुस्तकाचे प्रकाशन

खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष अ‍ॅड. वंदना चव्हाण यांच्या कार्यकर्तृत्वावरील ‘प्रबोधन माध्यम प्रकाशन’ निर्मित ‘वंदना चव्हाण : अनरेवेिलग ट्र स्टेट्समनशिप’ या पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी करण्यात आले. खासदार वंदना चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी शहर
कार्यालयात या ‘इयर बुक’च्या चौथ्या वर्षांच्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. महापौर प्रशांत जगताप, खासदार वंदना चव्हाण आणि ‘प्रबोधन माध्यम प्रकाशन’च्या संचालक गौरी बीडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष वासंती काकडे, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, वैशाली बनकर, नगरसेविका संगिता पठारे, मीनल सरोदे, अप्पा रेणूसे, विशाल तांबे, तसेच अशोक राठी, आनंद रिठे, किशोर विटकर, आनंद अलगुडे, सर्व विभागांचे पदाधिकारी, विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष उपस्थित होते. खासदार वंदना चव्हाण यांनी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष म्हणून केलेली कामगिरी, राज्यसभा सदस्य या नात्याने केलेले अभ्यासदौरे, पर्यावरणस्नेही उपक्रम, महिला सक्षमीकरणाचे उपक्रम, शहर विकासासाठी केलेले काम याचा मागोवा या ‘कॉफी टेबल बुक’ प्रकारातील पुस्तकात घेण्यात आला आहे. ‘प्रबोधन माध्यम’च्या वतीने आयोजित या उपक्रमाचे हे चौथे वर्ष होते.

No comments:

Post a Comment