Wednesday, 6 July 2016

कन्हय्या कुमार म्हणतो Bye Bye स्मृती इराणी

नवी दिल्ली, दि. 6 - मनुष्यबळ विकास खात्याच्या मंत्रिपदावरून स्मृती इराणी यांच्या गच्छन्तीचे जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी नेता कन्हय्या कुमारने स्वागत केले आहे. अर्थात, रोहित वेमुलाच्या आत्महत्येचा विचार करता ही शिक्षा पुरेशी नसल्याचेही त्याने म्हटले आहे. स्मृती इराणींकडून मनुष्यबऴ
विकास हे खाते काढून घेण्यात आले असून त्यांच्याकडे वस्त्रोद्योग खात्याचा भार देण्यात आला आहे.
हैदराबादमध्ये आत्महत्या केलेल्या रोहित वेमुलाच्या आत्महत्येचा विचार करता त्याला अद्याप न्याय मिळाला नसल्याचे कन्हय्या याने म्हटले आहे. मंत्रिमंडळातील पदांची अदलाबदल ही खरी शिक्षा नव्हे असे म्हणताना, कन्हय्याने बाय बाय, स्मृती इराणी असे म्हणत, त्यांच्याकडून किमान मनुष्यबळ विकास खाते काढून घेतल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

No comments:

Post a Comment