Thursday, 7 July 2016

राज्य मंत्रिमंडळ विस्तार, भाजपची नावे निश्चित

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई :  राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर भाजपमधल्या मंत्रिपदाच्या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय.  पांडुरंग फुंडकर, सुभाष देशमुख, जयकुमार रावल, संभाजी पाटील निलंगेकर, मदन येरावार आणि शिवाजीराव नाईक यांची मंत्रिपदी वर्णी लागणार आहे.  तर मित्रपक्षा कडून
महादेव जानकर आणि सदाभाऊ खोत यांची मंत्रिपदं निश्चित करण्यात आली आहे.. नेहमी राजभवनात होणारा शपथविधीचा कार्यक्रम यंदा विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये होणार आहे. त्यासाठी तयारी सुरू आहे.

No comments:

Post a Comment