Saturday, 9 July 2016

रॉजर फेडररचा पराभव, कॅनडाच्या मिलोस राओनिची अंतिम फेरीत धडक

माजी विजेता आणि तब्बल ७ वेळचा विम्बल्डन चॅम्पियन असलेल्या स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररने झुंजार खेळाचे प्रदर्शन केले, मात्र उपांत्य सामन्यात कॅनडाच्या मिलोस राओनिकडून त्याला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. कॅनडाच्या मिलोस राओनिकने ६-३, ६-७(३), ४-६, ७-५, ६-३ अशा फरकाने पराभव
केला. विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत पराभव होण्याची रॉजर फेडररची ही पहिलीच वेळ. तर विम्बल्डन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा मिलोस राओनिक कॅनडाचा पहिला टेनिसपटू ठरला आहे. तब्बल ५ सेटपर्यंत रंगलेल्या या अत्यंत अटीतटीच्य लढतीत मिलोस राओनिक ने फेडरर वर मात केली.  अव्वल खेळाडू नोव्हाक जोकोविच आणि स्टॅन वावरिंका यांचा धक्कादायक पराभव तसेच, स्पेनचा कट्टर प्रतिस्पर्धी राफेल नदालने दुखापतीमुळे घेतलेली माघार यामुळे फेडररला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात होते. 

1 comment: