Wednesday, 6 July 2016

आयटीतील लाखो होतील बेरोजगार !

नवी दिल्ली : स्वयंचलित उपकरणांचे चलन वाढत चालल्यामुळे २0२१ सालापर्यंत आयटी क्षेत्रातील ६.४ लाख लोकांच्या नोकऱ्या जाणार आहेत. एका अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.विशेष म्हणजे तुलनेने कमी कुशल असणाऱ्या लोकांनाच नोकऱ्या गमवाव्या लागणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाती घेतलेल्या
‘कुशल भारत’ मोहिमेला यामुळे धक्का लागणार आहे.एचएसएफ रिसर्च या संस्थेने हा अभ्यास केला आहे. अभ्यासांती जारी करण्यात आलेल्या अहवालात म्हटले आहे की, भारत आणि विदेशात मिळून आयटी क्षेत्रातील ९ टक्के नोकऱ्या यंत्रे संपवून टाकणार आहेत. यंत्रांमुळे गमावल्या जाऊ शकणाऱ्या या नोकऱ्यांची एकूण संख्या १.४ दशलक्ष इतकी आहे. एचएफएसने म्हटले की, कमी कुशल रोजगारांच्या उपलब्धतेत ३0 टक्क्यांनी घट होईल. याच वेळी मध्यम कुशल रोजगारांत ८ टक्क्यांची, तर उच्च प्रमाणात कुशल रोजगारांत ५६ टक्क्यांची वाढ होईल.कौशल्यावर लक्ष केंद्रित करायला हवे.नासकॉमच्या वरिष्ठ उपाध्यक्ष संगीता गुप्ता यांनी सांगितले की, नव्याने निर्माण होणाऱ्या नोकऱ्यांचा हिशेब एचएफएसच्या अभ्यासात घेतलेला दिसत नाही. स्वयंचलितीकरण आणि रोबोटिक्स यामुळे नेमका काय नफा-तोटा झाला, हे नेमकेपणे कोणीच पाहू शकत नाही.स्वयंचलित उपकरणांचा काही प्रमाणात परिणाम होतो. तथापि, नव्या तंत्रज्ञानाने नोकऱ्यांची निर्मितीच होते. प्रमाणापेक्षा कौशल्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. अमुक इतक्या नोकऱ्या संपणार, असे म्हणणे चूक आहे. नोकऱ्या अन्यत्र निर्माण होतच असतात. बीपीओ उद्योगासमोर संकट..स्वयंचलितीकरणाचा फटका बीपीओ क्षेत्रास मोठ्या प्रमाणात बसेल. बीपीओ संस्था अँटवर्क्सचे सीईओ आशिष मेहरा यांनी सांगितले की, रोबोटिक प्रोसेस आॅटोमेशनमुळे म्हणजेच रोबोटकृत स्वयंचलित प्रक्रियेचा अवलंब वाढल्यामुळे येत्या दोन वर्षांत बीपीओ उद्योगासमोर संकट उभे राहील.कपातच नव्हे तर; नवे पदेही होणार तयार एचएफएस रिसर्चचे सीईओ फिल फ्रेश्ट यांनी सांगितले की, कमी गुणवत्तेची ३0 टक्के पदे रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झालेली असल्याचे आम्ही नेमकेपणाने टिपले आहे.आगामी पाच वर्षांत ही पदे रद्द होत राहतील. त्याच वेळी मध्यम आणि उच्च गुणवत्तेची गरज असलेली नवी पदे तयार होतील.एचएफएसने १,४७७ कंपन्यांतील नियुक्त्यांचा कल अभ्यासून हा निष्कर्ष काढला आहे. 30%पदे रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली.

No comments:

Post a Comment